

Youth Couple End Of Life
esakal
Kankavali Crime : कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील धरणामध्ये तरुण आणि तरुणीने आत्महत्या केली. मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांचेही मृतदेह धरणपात्रात आढळून आल्यानंतर हा प्रकार पुढे आला. सोहम कृष्णा चिंदरकर (वय २१, रा. कुंभारवाडी कलमठ) व ईश्वरी दीपक राणे (१८, रा. बांधकरवाडी) अशी त्यांची नावे आहेत. सोहमचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यानंतर काल (ता. ९) सायंकाळी उशिरा त्याने ईश्वरीला घेऊन तरंदळे धरण गाठले आणि दोघांनीही पाण्यात उडी मारल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सोहम याचा मोबाईल काल (ता. ९) दुपारी एकच्या सुमारास हरवला. त्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. घरी आल्यावर मोबाईल हरवल्याचे तीव्र दु:ख झाल्याची बाब त्याने कुटुंबीयांना सांगितली होती.