सुधागड तालुक्यातील घोटवडे येथील तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सुधागड तालुक्यातील घोटवडे येथील 31 वर्षीय तरुणाने गुरुवारी (ता.18) झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
suicide
suicidesakal

पाली - सुधागड तालुक्यातील घोटवडे येथील 31 वर्षीय तरुणाने गुरुवारी (ता.18) झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

जांभूळपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोटवडे येथील सुरेश ज्ञानेश्वर मोरे (वय 31) या तरुणाने घरगुती कारणाच्या रागामधून घोटवडे गावाच्या हद्दीतील साकुडा भागामध्ये असलेल्या ओव्हळातील वडाच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची जांभूळपाडा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.के. म्हात्रे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com