कणकवली तालुक्यात अपघातामध्ये जानवलीचा तरूण ठार

तुषार सावंत
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

कणकवली - ट्रकच्या धडकेत तालुक्यातील जानवली येथील तरूण ठार झाला. नंदकिशोर ढेकणे (वय 35, जानवली, वाकाडवाडी)  असे मृत तरूणाचे नाव आहे. आज दुपारी एकच्या सुमारास जानवली पुलानजीक सापळेशोरूमसमोर हा अपघात झाला. 

कणकवली - ट्रकच्या धडकेत तालुक्यातील जानवली येथील तरूण ठार झाला. नंदकिशोर ढेकणे (वय 35, जानवली, वाकाडवाडी)  असे मृत तरूणाचे नाव आहे. आज दुपारी एकच्या सुमारास 
जानवली पुलानजीक सापळेशोरूमसमोर हा अपघात झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदकिशोर हा मोटारसायकलवरून कणकवलीकडे जात होता. जानवली पुलानजीक सापळेशोरुमसमोर त्याचा मोटारसायकलला ट्रकची धडक बसली. ट्रकच्या धडकेत मोटरसाकल रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यात नंदकिशोरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच तो जागीच ठार झाला.

नंदकिशोर हा जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम करत असे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

Web Title: youth from Janavali dead in an accident