वीजवाहिनीच्या धक्‍क्‍याने गच्चीवरून पडून तरुण ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मालवण - बहिणीकडे कामानिमित्त आलेल्या राहुल रामचंद्र गोसावी (वय 23, रा. नालासोपारा, मुंबई) याचा उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने धक्का बसून गच्चीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. 

मुंबई येथील राहुल आज सकाळी आईसमवेत वायरी येथे राहणाऱ्या रूपेश गोसावी यांच्याकडे आला होता. वर्षभरापूर्वी राहुल याच्या वडिलांचे निधन झाले होते. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाचे निमंत्रण देण्यासाठी राहुल आपल्या बहिणीच्या घरी म्हणजेच रूपेश यांच्याकडे आला होता. बहिणीचे घर कसे आहे, हे पाहण्यासाठी तो गच्चीवर गेला होता. याचवेळी भ्रमणध्वनीवरून बोलत असताना गच्चीच्या बाजूनेच गेलेल्या अकरा केव्हीच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीस त्याचा स्पर्श झाला. यात विजेच्या धक्‍क्‍याने तो खाली फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कामास होता. 

Web Title: Youth killed by the electric shock

टॅग्स