जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतनाविना होताहेत हाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

कणकवली - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन दोनखाली येणाऱ्या तब्बल ४५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने नाराजीचे वातावरण आहे. अनुदान न मिळाल्याने ही अडचण आल्याचे सांगण्यात येते, मात्र येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे, असे सामान्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या शिपाई ते कक्ष अधिकारी अशा ४५० शासकीय नोकरदारांचे वेतन लांबण्याची ही तशी पहिली वेळ नसली तरी मार्चमध्ये अशा पद्धतीने वेतन लांबले जात होते, मात्र यंदा माहे फेब्रुवारीचे वेतन १५ मार्चपर्यत जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याची चर्चा जि. प. भवनापासून पंचायत समित्यापर्यत गेले पंधरा दिवस सुरू आहे. मार्चअखेर आली तरी वेतन लांबल्याने चतुर्थ कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही कपाती तसेच काही तांत्रिक बाबींमुळे वेतन आदा करण्यास उशीर झाला, असे सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत ट्रेझरीमार्फत वेतन खात्यात जमा होईल, असे सांगितले जात आहे. या पूर्वी ऑनलाइन वेतन प्रक्रिया सुरू करताना अशी वेळ आली होती. तेव्हाही वेतन लांबले होते. कर्मचाऱ्यांना समाधानकारक वेतन मिळत असले तरी वाढती महागाई, मुलांच्या शाळा, महाविद्यालयांचा खर्च, दहावी-बारावीची परीक्षा, होळीचा सण या बाबी लक्षात घेता. मासिक वेतन वेळीच न मिळाल्याने अनेकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले.

Web Title: zp employee without payment