
-अमित गवळे
पाली : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणातही नवनवीन क्रांती घडत आहे. याच क्रांतीचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कांटीचे प्राथमिक शिक्षक शरद बबन घुले यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि अत्यंत उपयुक्त शैक्षणिक ॲप्स विकसित केले आहेत.