भारतीय संघ आता पुन्हा नव्या जर्सीत मैदानात उतरणार

Indian jersey will now display BYJUS logo instead of OPPO
Indian jersey will now display BYJUS logo instead of OPPO

नवी दिल्ली: शिक्षण क्षेत्रातील सेवा पुरवणाऱ्या बायजूस ( Byju's) आता  भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीवर जागा घेणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारातील नावाजलेली  ओप्पो जाऊन आता त्याजागी आता  Byju's येणार आहे. 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघासाठी लॉन्च करण्यात आलेल्या नव्या जर्सीमध्ये फार काही बदल केल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आता भारतीय क्रिकट संघाचा ब्रँड पार्टनर असल्यामुळे नव्या जर्सीवर  Byju's असे ठळक अक्षरात दिसणार आहे.  २०१७ मध्ये झालेल्या करारानुसार, ओप्पोने 1,079 कोटी रुपयांना बोली लावली होती. ती जिंकून भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर ओप्पोने जागा मिळविली होती. 

वेस्ट इंडिजच्या सामन्यात  भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर ओप्पो दिसणार आहे. मात्र सप्टेंबर दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात नवीन Byju's असलेली नवी जर्सी दिसणार आहे. 

बायजूस ( Byju's) या शिक्षण क्षेत्रातील सेवा पुरवणाऱ्या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीचे बाजारमूल्य 5.5 अब्ज डॉलरवर (जवळपास 37,400 कोटी रुपये) पोचले आहे. त्यामुळे बायजूस आता जगातील सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. यातून बायजूसने एक नवा इतिहासच घडवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com