डोंबिवलीमध्ये होणार क्रिकेट अकादमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

कल्याण : ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमधील खेळाडूंना सरावासाठी मुंबईला जावे लागू नये, यासाठी कल्याण-डोंबिवलीमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी आज कल्याण-डोंबिवलीमधील मैदानाची प्राथमिक पाहणी केली असून, डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये क्रिकेटला पोषक वातावरण आहे. त्यामुळे भविष्यात डोंबिवलीमध्ये अकादमीबाबत विचार करू, अशी माहिती क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी "सकाळ'ला दिली. 

कल्याण आणि डोंबिवलीतील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काळात कल्याण-डोंबिवलीमध्ये क्रिकेट अकादमी सुरू होण्याची शक्‍यता आहे. शनिवारी (ता. 22) वेंगसरकर यांनी कल्याण-डोंबिवलीमधील महापालिकेच्या मैदानाची पाहणी केली.

या वेळी पालिका आयुक्त ई रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना पालिका गटनेते रमेश जाधव, नगरसेवक नीलेश शिंदे, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, तसेच पालिका अधिकारीही उपस्थित होते. कल्याण पश्‍चिमेकडील सुभाष मैदान, पूर्वेकडील 100 फुटी रस्त्यावरील स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍ससाठी आरक्षित भूखंड आणि डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल या तीन ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर वेंगसरकर यांनी कल्याण-डोंबिवलीमधील मैदानांची स्थिती व सुविधांबाबत प्राथमिक पाहणी केली.

यामध्ये डोंबिवलीमधील मैदान क्रिकेटसाठी पोषक असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Dombivali to have new cricket acadamy