esakal | गाफीलपणामुळे युनायटेडला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रुसेल्स - चॅंपियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्या अँडरलेट संघाच्या लिअँडर डेंडोनकेर याने मॅंचेस्टर युनायटेड विरुद्ध अखेरच्या क्षणी हेडरद्वारे गोल केला तो क्षण.

गाफीलपणामुळे युनायटेडला धक्का

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ब्रुसेल्स (बेल्जियम) - गाफीलपणा आणि पंचांच्या सदोष कामगिरीने चॅंपियन्स लीग स्पर्धेत मॅंचेस्टर युनायटेडला गुरुवारी झालेल्या अँडरलेट संघाविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

मॅंचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक जोस मौरिन्हो यांनी याच सगळ्यांना अपयशासाठी कारणीभूत धरले आहे. सामन्याच्या 36व्या मिनिटाला मॅंचेस्टरने खाते उघडले होते; पण त्यानंतर त्यांना आपले गोलाधिक्‍य वाढवण्यात अपयश आले. त्यानंतर सामना संपण्यास अवघी चार मिनिटे बाकी असताना अँडरलेट संघाने बरोबरी साधली. संपूर्ण सामन्यात त्यांनी हा एकमेव प्रयत्न केला होता.

उपांत्यपूर्व फेरीच्या या पहिल्या टप्प्यातील सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने प्रशिक्षक मौरिन्हो काहीसे चिडलेले होते. ते म्हणाले,""सामन्याचा निकाल यापेक्षा वेगळा लागायला हवा होता. म्हणजे आम्ही विजय मिळविणे अपेक्षित होते. पंचांचे काही निकाल विरोधात गेले असतीलही, पण आमचे खेळाडू प्रतिभेला न्याय देऊ शकले नाहीत. पंचांचे चुकीच्या निर्णयाला खेळाडूंच्या चुकांची जोड मिळाली. ते जिद्दीने आक्रमण करू शकले नाहीत. हेच खरे.''

मौरिन्हो यांनी सामन्यानंतर अपयशाचे सगळे खापर त्यांच्या आक्रमकांवर फोडले. ते म्हणाले,""सुदैवाने आमचे बचावपटू सतर्क राहिले. नाही, तर आमचे काही खरे नव्हते. मी, जर या संघातील बचावपटू असतो, तर आक्रमकांच्या खेळामुळे अधिक निराश झालो असतो. आमच्या आक्रमकांनी घोडचुका करून त्यांनी सामना जवळ जवळ गमावल्यात जमा होता. प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडायचे हा युनायटेडचा लौकिक ते राखू शकले नाहीत.''

मौरिन्हो यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा संताप समोर येत होतो. ते म्हणाले,""आम्ही संधी गमाविल्याचे दुःख नाही. आम्ही खूप काही संधी गमावल्या नाहीत. पंचांच्या सदोष कामगिरीचाही आम्हाला फटका बसला.''

चॅंपियन्स लीगमधील परतीचा सामना 20 एप्रिल रोजी होणार आहे. त्यापूर्वी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रविवारी युनायटेड वि. चेल्सी हा इंग्लिश प्रीमियर लीगमधील सामना होणार आहे.

संपूर्ण सामन्यावर युनाटेडचे वर्चस्व होते; पण त्याचे ते विजयात रूपांतर करू शकले नाहीत. अंडरलेट संघही फार काही चांगला खेळ दाखवू शकला नाही. त्यांच्याकडून संपूर्ण सामन्यात केवळ एकदाच युनायटेडच्या जाळीच्या दिशेने आक्रमण झाले आणि हाच त्यांचा पहिला आणि अखेरचा प्रयत्न होता. याच एकमात्र फटक्‍यावर सामना संपण्यास चार मिनिटे असताना लिएंडर डेंडोन्केर याने अंडरलेटला बराबेरी साधून दिली.

loading image