कोठे आणि कसा तयार होतो फुटबॉल विश्वकरंडक

वृत्तसंस्था
Saturday, 23 June 2018

फुटबॉल विश्वकरंडकाची पात्रता फेरीही पार न करु शकलेल्या इटलीचे विश्वकरंडकाशी असलेले नाते मात्र अतूट आहे. यंदा रशियात होत असलेल्या विश्वकरंडकात इटलीचा संघ खेळत नसला तरी इटलीत तयार होणारा विश्वकरंडकच विजयी संघाच्या हातात असणार आहे.

फुटबॉल विश्वकरंडकाची पात्रता फेरीही पार न करु शकलेल्या इटलीचे विश्वकरंडकाशी असलेले नाते मात्र अतूट आहे. यंदा रशियात होत असलेल्या विश्वकरंडकात इटलीचा संघ खेळत नसला तरी इटलीत तयार होणारा विश्वकरंडकच विजयी संघाच्या हातात असणार आहे.

दर चार वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी इटलीतील मिलान शहराजवळील पेडर्नो दुगनानो या छोट्याशा गावातील पिंक वॉल फॅक्टरीमध्ये विश्वकरंडक बनविण्यात येतो. फुटबॉल विश्वकरंडकाचे नवे डिझाईन बनविण्यासाठी 1970 घेण्यात आलेल्या स्पर्धेत कलाकार सिल्व्हिओ गॅझिनिगा यांच्या डिझाईनची फिफाकडून निवड करण्यात आली. तेव्हापासून अशा विश्वकरंडकाची प्रतिकृती बनविण्यात येत आहे. अद्याप हीच प्रतिकृती विश्वकरंडक विजेत्या संघाला दिला जातो.  

दर चार वर्षांनी विश्वकरंडकाची ब्राँझ प्रतिकृती विजेत्या संघाच्या फुटबॉल महासंघाकडे सोपवण्यात येते. तसेच खेळाडूंना देण्यात येणारी पदके ही सोन्याची असतात, ती पदके तयार केल्यानंतर अल्कोहोलने स्वच्छ केले जाते. 

कसा तयार होतो फुटबॉल करंडक?
- विजेत्या संघाला देण्यात येणारा ब्राँझचा करंडक वर्कशॉपमधून आल्यावर त्याच्यावरील धातूचे जादा आवरण काढले जाते  
- त्यानंतर करंडकावरील बारकावे हाताने कोरले जातात.
- मग करंडकाला चकाकी देण्याचे काम केले जाते 
- त्यानंतर विद्युतप्रवाह विभागात करंडकाला ध्वनीलहरीविरहीत करण्याचे काम केले जाते
- मग शेवटी करंडकाला डिस्टिल पाण्याने स्वच्छ केले जाते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How and where the football trophy is made