फुटबॉलच्या संग्रहाचा छंद 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

प्रत्येक लहान मुलाला नव्या फुटबॉलचे नेहमीच आकर्षण असते. पण, रशियाचे माजी फुटबॉल रेफ्री मिखाईल कोशेलेव यांना असलेले फुटबॉल संग्रहाचे वेड वेगळेच आहे. त्यांच्या संग्रहात तब्बल 800 फुटबॉल आहेत.

प्रत्येक लहान मुलाला नव्या फुटबॉलचे नेहमीच आकर्षण असते. पण, रशियाचे माजी फुटबॉल रेफ्री मिखाईल कोशेलेव यांना असलेले फुटबॉल संग्रहाचे वेड वेगळेच आहे. त्यांच्या संग्रहात तब्बल 800 फुटबॉल आहेत.

कोशेलेव यांच्या संग्रहालयात 19व्या शतकातील शीप्सकीन बॉलपासून अगदी चॅंपियन्स लीगमधील अंतिम सामन्यातील आणि विश्‍वकरंडक स्पर्धेत वापरले गेलेले फुटबॉल आहेत. कोशेलेव म्हणतात, ""फुटबॉलचा रंगच वेगळा आहे. फुटबॉल नसता तर हा खेळच नसता, पेले, ख्रिस्तिआनो रोनाल्डो, मेस्सी असे स्टार मिळालेच नसते.'' त्यांच्या संग्रहात महिलांच्या 2003 विश्‍वकरंडक स्पर्धेत वापरलेला फुटबॉलही आहे.

Web Title: intrest collection of football