जपान बाद फेरी गाठण्यात सुदैवी, सेनेगलला हरवून कोलंबियाची बाद फेरीत मुसंडी

वृत्तसंस्था
Friday, 29 June 2018

सामारा/वोल्गोग्राड, ता. 28 ः विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सरस शिस्तबद्ध खेळ केल्यामुळे जपानने बाद फेरीत प्रवेश केला, तर कोलंबियाने सेनेगलला पराजित करून बाद फेरीचे तिकीट पक्के केले. सेनेगलला अतिरिक्त पिवळ्या कार्डमुळे साखळीत बाद व्हावे लागले.

सामारा/वोल्गोग्राड, ता. 28 ः विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सरस शिस्तबद्ध खेळ केल्यामुळे जपानने बाद फेरीत प्रवेश केला, तर कोलंबियाने सेनेगलला पराजित करून बाद फेरीचे तिकीट पक्के केले. सेनेगलला अतिरिक्त पिवळ्या कार्डमुळे साखळीत बाद व्हावे लागले.

ह गटातील सांगता फेरीच्या लढती सुरू होण्यापूर्वी कोलंबिया तिसरे होते, पण ते आता गटविजेते झाले आहेत; तर जपानने धसमुसळ्या खेळातून स्वतःला वाचवण्यास पसंती दिली आणि सेनेगलला कोलंबियाविरुद्ध बरोबरीचा गोल करता आला नाही, पर्यायाने त्यांच्यावर साखळीतच बाद होण्याची वेळ आली. 2002 च्या स्पर्धेत तत्कालीन गतविजेत्या फ्रान्सला हरवून प्रकाशात आलेले सेनेगल या वेळी संधी असतानाही स्वतःला वाचवू शकले नाहीत.

जपानने पोलंडविरुद्धची लढत 0-1 गमावली, पण एक गोल स्वीकारल्यावर जपानने स्वतःतच चेंडू पास करीत ठेवला आणि तोही आपल्या भागात. एखादा जरी गोल स्वीकारला तर साखळीत बाद व्हावे लागेल याची जाणीव जपानला होती. साखळीतच बाद झालेल्या पोलंडनेही जपानची गणिते बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. ते विजयावर समाधानी होते.

सेनेगलचा पवित्रा जास्त धक्कादायक होता. जपानविरुद्ध गोल झाल्यामुळे सेनेगलला कोलंबियाविरुद्धची बरोबरी बाद फेरीसाठी पुरेशी होती. पण सेनेगलने उत्तरार्धात बरोबरीसाठी प्रयत्न केले नाहीत. अखेरच्या फेरीपूर्वीची गणित कोलंबियाच्या गोलने बदलली आहेत, हे त्यांच्या बहुदा लक्षातच आले नाही. येरी मीना याने 74 व्या मिनिटास केलेल्या हेडरने कोलंबियास बाद फेरीत नेले होते.

फरक जपान आणि सेनेगलमधील
जपान ः 4 गुण, गोलफरक 0, केलेले गोल 4, यलो कार्डस्‌ 4
सेनेगल ः 4 गुण, गोलफरक 0, केलेले गोल 4, यलो कार्डस्‌ 6


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan lucky to be qualified