मॅराडोना नव्या वादाच्या भोवऱ्यात 

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

मैदानाबरोबर अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोनाची मैदानाबाहेरील कारकीर्दही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. रशियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत शनिवारी अर्जेंटिना-आईसलॅंडच्या सामन्यादरम्यान मॅराडोना सिगार ओढत असल्याचे निदर्शनास आले आहे. रशियाने विश्‍वकरंडकाच्या कालावधीत सर्व मैदानावर सिगारेट्‌स आणि तंबाखूवर निर्बंध आणले आहेत.

मॉस्को - मैदानाबरोबर अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोनाची मैदानाबाहेरील कारकीर्दही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. रशियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत शनिवारी अर्जेंटिना-आईसलॅंडच्या सामन्यादरम्यान मॅराडोना सिगार ओढत असल्याचे निदर्शनास आले आहे. रशियाने विश्‍वकरंडकाच्या कालावधीत सर्व मैदानावर सिगारेट्‌स आणि तंबाखूवर निर्बंध आणले आहेत.

मॅराडोना बसलेल्या जागेवर सिगार ओढत असल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे तो बसलेल्या जागी बरोबर वरच्या बाजूनला "नो स्मोकिंग'चा फलकही लावण्यात आलेला होता. हे कमी पडले म्हणून सामन्यानंतर कोरियन प्रेक्षकांकडे बघून वर्णद्वेषी हावभाव केल्याची टीकाही त्याच्यावर केली जात आहे. दरम्यान, मॅराडोनाने ही टिका फेटाळली असून, विश्‍वकरंडक स्पर्धेच्यादरम्यान प्रत्येक ठिकाणी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी हे बातम्या शोधत फिरत असतात, असे मॅराडोनाचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maradona is in a new controversy