विश्‍वकरंडकात कुणीही विजयाची गुरुकिल्ली स्वाधीन करीत नसते

वृत्तसंस्था
Sunday, 1 July 2018

बेल्जियमविरुद्ध मुद्दाम पराभूत होत इंग्लंडने खडतर ड्रॉ टाळल्याची चर्चा होत असली, तरी बेल्जियमचे स्पॅनिश मार्गदर्शक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ते म्हणाले की, विश्‍वकरंडकात यशस्वी व्हायचे असेल, तर विजय मिळवून देणारी गुरुकिल्ली प्रतिस्पर्धी तुमच्याकडे स्वाधीन करेल, अशी अपेक्षा बाळगता येत नाही.

मॉस्को - बेल्जियमविरुद्ध मुद्दाम पराभूत होत इंग्लंडने खडतर ड्रॉ टाळल्याची चर्चा होत असली, तरी बेल्जियमचे स्पॅनिश मार्गदर्शक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ते म्हणाले की, विश्‍वकरंडकात यशस्वी व्हायचे असेल, तर विजय मिळवून देणारी गुरुकिल्ली प्रतिस्पर्धी तुमच्याकडे स्वाधीन करेल, अशी अपेक्षा बाळगता येत नाही.

आपल्याला सोपा मार्ग गवसेल, अशी आशा बाळगून यश मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी युरो स्पर्धेत हे घडल्याचे आपण पाहिले. आमचे खेळाडू सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यास सज्ज आहेत.' विक्रमवीर स्ट्रायकर रोमेलू लुकाकू घोट्याच्या दुखापतीमधून आणि थॉमस व्हेर्माएलन डोळ्याच्या दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्याची ग्वाही त्यांनी दिली. बेल्जियमची सोमवारी जपानशी लढत होत आहे. मार्टिनेझ मूळचे स्पेनचे आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये पदार्पणात त्यांचा स्पेनविरुद्ध पराभव झाला. तेव्हापासून बेल्जियम 22 सामन्यांत अपराजित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roberto martinez statement on football world cup