esakal | पेटिट, एंजल मिकी मिने प्रशालेचा दणदणीत विजय
sakal

बोलून बातमी शोधा

पेटिट, एंजल मिकी मिने प्रशालेचा दणदणीत विजय

पेटिट, एंजल मिकी मिने प्रशालेचा दणदणीत विजय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत रविवारी मुलांच्या गटात जे. एन. पेटिट, तर मुलींच्या गटात एंजल मिकी मिने संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळविला.

ढोबरवाडी येथील मैदानावर झालेल्या मुलांच्या गटातील सामन्यात पेटिट प्रशाला संघाने डॉ. कलमाडी प्रशालेचा ७-० असा पराभव केला. वेदांत मुठेकर याने हॅटट्रिक नोंदवताना तीन गोल केले. त्याला अथर्व लोणकरने दोन, तर आदित्य पाटील आणि सिद्धांत घटवाल यांनी प्रत्येकी एकेक गोल करून सुरेख साथ केली. 

एनसीएल मैदानावर मुलींच्या गटात झालेल्या एका सामन्यात एंजल मिकी मिने स्कूलने प्रतिस्पर्धी अँग्लो उर्दू प्रशालेचा ११-० असा धुव्वा उडवला. विजयी संघाकडून मनमीत कापसे, पियुषा नरके आणि अंकिता शेलार यांनी प्रत्येकी तीन, तर जुई हरपाळे हिने दोन गोल केले.

निकाल ः मुली ः अमानोरा स्कूल, हडपसर वि.वि. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल १-०, सेंट मेरीज स्कूल, कॅम्प वि.वि. मिलेनियम नॅशनल स्कूल ४-०, सेंट हेलेनाज प्रशाला वि.वि. सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, आंबेगाव ३-०, एंजल मिकी मिने स्कूल, हडपसर वि.वि. अँग्लो उर्दू प्रशाला, कॅम्प ११-०

मुले ः केंद्रीय विद्यालय, खडकवासला अनिर्णित वि. विबग्योर प्रशाला, बालेवाडी १-१, सेंट उर्सुला प्रशाला, आकुर्डी अनिर्णित ली आर्चिड प्रशाला, बाणेर १-१, बिशप्स को-एड प्रशाला, कल्याणीनगर अनिर्णित वि. हिलग्रीन प्रशाला ०-०, सेंट व्हिन्सेंट प्रशाला, कॅम्प वि.वि. सेंट जोसेफ इंग्लिश माध्यम प्रशाला १-०, जे.एन. पेटिट प्रशाला वि.वि. डॉ. कलमाडी प्रशाला, औंध ७-०, लॉयला प्रशाला, पाषाण वि.वि. डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, औंध १-०.

loading image