17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल भारताचे सामने मुंबईऐवजी दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारतात होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला असून, त्यानुसार स्पर्धेतील भारताचे सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानाऐवजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात येतील.

भारतीय फुटबॉल महासंघाने हा बदल केला असला तरी, अजून त्याची माहिती "फिफा' आणि स्थानिक संयोजन समितीला देण्यात आलेली नाही. क्रीडा मंत्रालयाने भारताचे सामने नवी दिल्लीत खेळविण्याची मागणी केल्यामुळे आम्हाला हा बदल करावा लागल्याचे फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी सांगितले.

"फिफा' अनभिज्ञ
स्पर्धेतील सामने अन्यत्र हलविण्यात आल्याची आम्हाला कल्पना नसल्याचे "फिफा'ने स्पष्ट केले आहे. "फिफा' मुंबईत 7 जुलै रोजी स्पर्धेच्या अधिकृत कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुंबईत अ गटातील तीन साखळी लढती होणार होत्या. दिल्लीत केवळ एक लढत खेळविली जाणार होती. मात्र, आता "अ' गटाचे सर्व सामने दिल्लीत होतील. मुंबईला "ब' गटाचे सामने खेळविण्यात येतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worldcup football competition