रेंजहिल्स प्रशालेचा दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

पुणे - हॉकी सामन्यातील दणदणीत विजयाची मालिका शुक्रवारीदेखील कायम राहिली. नेहरूनगर येथे आज झालेल्या सामन्यात खडकीच्या रेंजहिल्स सेकंडरी प्रशालेने जयहिंद प्रशालेचा १०-० असा धुव्वा उडवला. 

पुणे - हॉकी सामन्यातील दणदणीत विजयाची मालिका शुक्रवारीदेखील कायम राहिली. नेहरूनगर येथे आज झालेल्या सामन्यात खडकीच्या रेंजहिल्स सेकंडरी प्रशालेने जयहिंद प्रशालेचा १०-० असा धुव्वा उडवला. 

रेंजहिल्सच्या विजयात अनिरुद्ध सिन्हा याने हॅट्ट्रिक साधली. त्यापेक्षा त्यांचा वेगवान खेळ लक्षवेधक ठरला. त्यांनी पहिल्या पाच मिनिटांत तीन गोल केले. यामध्ये अनुष पिल्ले याने तिसऱ्या आणि चौथ्या, तर आकाश बनी याने पाचव्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर अनिरुद्धने ११ आणि १७व्या मिनिटाला गोल साधून आघाडी वाढवली. दोनच मिनिटांनी स्वप्निल रणदिवे याने आघाडी वाढवली. त्यानंतर अनिरुद्धने वैयक्तिक तिसरा, स्वप्निलने दुसरा आणि आदित्य रसालायाने दोन गोल करून संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

अन्य एका सामन्यात मॉडर्न प्रशालेने (मराठी) आपली आगेकूच कायम राखली. सलग तिसरा विजय मिळविताना त्यांनी येरवड्याच्या केंद्रीय विद्यालयाचा कडवा प्रतिकार ३-२ असा मोडून काढला. केंद्रीय विद्यालयाने दोनवेळा बरोबरी साधली होती. विजयी संघाकडून यश काळेने दोन तर प्रथमेश खोपटकरने एक गोल केला. केंद्रीय विद्यालयासाठी शिवम थोरात आणि स्टिफल स्वामीने गोल केले.

मुलींच्या गटात पूर्वा भांबुरे आणि पी. अरोरा यांनी केलेल्या गोलच्या जोरावर सेंट ॲन्स प्रशालेने हडपसरच्या सेंट पॅट्रिक्‍स प्रशालेचा २-१ असा पराभव केला. सेंट पॅट्रिक्‍सचा एकमात्र गोल वैष्णवी चौधरी हिने केला. कलमाडी प्रशाला (औंध) आणि सेंट हेलेनाज प्रशाला यांच्यात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: renjhills school hockey

टॅग्स