भारतीय हॉकी संघांसाठी वैज्ञानिक सल्लागार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - भारताच्या हॉकीपटूंची तंदुरुस्ती उंचावण्यासाठी हॉकी इंडियाने चार वैज्ञानिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ संघाबरोबरच दोन्ही कुमार गटातील संघांसाठीदेखील असाच निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - भारताच्या हॉकीपटूंची तंदुरुस्ती उंचावण्यासाठी हॉकी इंडियाने चार वैज्ञानिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ संघाबरोबरच दोन्ही कुमार गटातील संघांसाठीदेखील असाच निर्णय घेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचे स्कॉट कॉनवे यांनी आजपासून बंगळूरला सुरू झालेल्या वरिष्ठ संघाच्या शिबिरापासून सूत्रेही स्वीकारली आहेत. दक्षिण आफ्रिकेचे रॉबिन अँथनी वेबस्टर आर्केल हे कुमार संघाचे काम पाहतील. दक्षिण आफ्रिकेचेच वेन पॅट्रिक लॉम्बर्ड यांच्याकडे महिला संघाची जबाबदारी आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल बेरी यांच्याकडे महिला संघाची सूत्रे आहेत.

कॉनवे यांची यापूर्वीच नियुक्ती झाली होती. त्यांच्या नावाची निश्‍चिती संभाव्य खेळाडूंची घोषणा करतानाच झाली होती. केवळ वरिष्ठ पुरुष संघासच नव्हे, तर अन्य संघांसाठीही ही नियुक्ती करण्याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणाने घेतला होता. त्यानुसार आर्केल, लॉम्बर्ड आणि बेरी यांच्या नियुक्तीची आज घोषणा करण्यात आली.

हॉकी इंडियाने या सर्वांच्या नियुक्तीचा निर्णय जानेवारीतच घेतला होता. परदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळीच ही निवड झाली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणाबरोबर चर्चा करूनच ही नियुक्ती केली होती, असे हॉकी इंडियाचे सचिव महम्मद मुश्‍ताक अहमद यांनी सांगितले. विश्‍वकरंडक स्पर्धा त्याहून महत्त्वाचे म्हणजे 2020चे टोकियो ऑलिंपिक लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. निवडलेल्या चारही सल्लागारांना विविध खेळांतील संघांबरोबर तसेच विविध देशांत काम करण्याचा अनुभव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scientific advisor for indian hockey team