हॉकीत बेल्जियमविरुद्ध भारताची अपयशी सलामी

पीटीआय
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - भारतास ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमला आंतरराष्ट्रीय हॉकी लढतीत कडवी लढत दिल्याचेच समाधान लाभले. अक्षरशः अखेरच्या मिनिटास गोल स्वीकारत भारताने बूम (बेल्जियम) येथील लढतीत हार पत्करली.

मुंबई - भारतास ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमला आंतरराष्ट्रीय हॉकी लढतीत कडवी लढत दिल्याचेच समाधान लाभले. अक्षरशः अखेरच्या मिनिटास गोल स्वीकारत भारताने बूम (बेल्जियम) येथील लढतीत हार पत्करली.

बेल्जियम हॉकी महासंघाने दिलेल्या माहितीनुसार या लढतीत कडवी चुरस झाली; पण त्यात बेल्जियमचे पारडे कायम वरचढ होते. यजमानांनी डे शॉरे स्टेडियमवरील या लढतीत चार पेनल्टी कॉर्नर मिळवताना एकच गमावला. बेल्जियमने या सामन्यात दोन गोलरक्षकांना संधी दिली; पण एकासही चकवण्यास भारतास यश आले नाही. बेल्जियमने चेंडूवर जास्त वर्चस्व राखले. भारतीयांनी प्रतिकार चांगला केला, पण आक्रमणात पुरेशी भेदकता नव्हती. अखेर भारताने ही लढत ०-१ गमावली. 

Web Title: sports news hockey