आशिया करंडक ही नवी सुरवात - मरिने

पीटीआय
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

बंगळूर - आगामी आशिया करंडक हॉकी स्पर्धा ही माझ्यासाठी आणि भारतीय वरिष्ठ हॉकी संघासाठी नव्याने सुरवात असेल, असे मत नवे प्रशिक्षक जोएर्ड मरिने यांनी व्यक्त केले आहे.

रोएलॅंट ऑल्टमन्स यांची अचानक हकालपट्टी झाल्यानंतर मरिने यांची आश्‍चर्यकारकपणे प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून आशिया करंडकापासूनच ते आपल्या नव्या जबाबदारीला सुरवात करत आहेत.

ते म्हणाले, ‘‘पुढील १५ महिन्यांत काय करण्याची गरज आहे, याची कल्पना येण्यासाठी आशिया करंडक स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर वर्ल्ड हॉकी लीग फायनल, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि विश्‍वकरंडक अशा महत्त्वाच्या स्पर्धेत आम्ही खेळणार आहोत.’’

सराव सत्र, सामने आणि नियोजन याविषयी बोलताना मरिने यांनी आपले मते स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले, ‘‘सराव सत्र आणि स्पर्धेतील सामने यामध्ये मोठा फरक आहे. आशिया करंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या छोट्या सराव सत्रात खेळाडूंना हे समजाविण्याचा प्रयत्न केला आहे. आता सामन्यातील परिस्थितीनुसार खेळाडू कसे खेळ करतात, हे आशिया स्पर्धेतून समजून येईल. त्यानुसार कुठल्या आघाडीवर तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे, याचा अंदाज येईल.’’

भारतीय हॉकी आणि संघाविषयी बोलताना मरिने यांनी हॉकी इंडियावर विश्‍वास दाखवला. ते म्हणाले, ‘‘भारतीय हॉकी आणि पर्यायाने संघासाठी हॉकी इंडिया आणि त्यांचे हाय परफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन आखत असलेल्या नियोजनावर माझा विश्‍वास आहे. सराव सत्रातील पहिले काही दिवस मला प्रत्येक खेळाडूची माहित करून घेण्यात गेले. मला खेळाडूंविषयी माहिती होती; पण त्यांना प्रशिक्षण देताना त्यांना जाणून घेणे महत्त्वाचे होते.’’

Web Title: sports news hockey Joard Marine