हॉकी : 'फायनल'साठी भारताला बरोबरी पुरेशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

चॅम्पियन्स करंडकात शनिवारी होणाऱ्या भारत विरुद्ध नेदरलॅंड या सामन्यात भारताने जरी नेदरलॅंडला बरोबरीत रोखले तरी भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित आहे. मात्र नेदरलॅंडला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उद्याच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.   

ब्रेडाः चॅम्पियन्स करंडकात शनिवारी होणाऱ्या भारत विरुद्ध नेदरलॅंड या सामन्यात भारताने जरी नेदरलॅंडला बरोबरीत रोखले तरी भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित आहे. मात्र नेदरलॅंडला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उद्याच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.   

दोन विजय, एक पराभव आणि एक बरोबरी यांमुळे सात गुणांसह भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. माजी विजेते ऑस्ट्रेलिया दहा गुणांसह पहिल्या स्थानावर असून त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित आहे. सहा संघाच्या मालिकेच्या नियमांनुसार पहिले दोन संघ अंतिम फेरीत जातात. जर भारत नेदरलॅंड विरुद्ध सामना जिंकला तर 2016 मधील चॅम्पियन्स करंडकाची पुनरावृत्ती होईल. 

भारतीय संघाचे मुख्य मार्गदर्शक हरिंदर सिंग यांच्या मार्गदर्शकतेखाली भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला तर अर्जेंटिनाला 2-1 असे पराभूत केले. रमनदिप सिंगला जरी दुखापत झालेली असली तरी संघातील सर्व स्ट्रायकरचा चांगला फॉर्म भारतीय संघासाठी उपयोगी पडेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tie is enough for India to reach final of Champions Trophy