संवेदनशील "जीएसटी'वर राज्यसभेत चर्चा

यूएनआय
Monday, 26 September 2016

नवी दिल्ली - गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील "वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक‘ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये मांडले. 

भारतीय करव्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून आणण्याची क्षमता या विधेयकामध्ये असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेमध्ये या विधेयकावर चर्चा सुरु झाली आहे. हे विधेयक मांडताना जेटली यांनी या विधेयकासंदर्भात विशेष राजकीय मतैक्‍य दाखविलेल्या विरोधकांचे विशेषत: कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे आभार मानले. 

जेटली म्हणाले - 
* जीसटीमुळे प्रगतीचा वेग वाढेल 
* या विधेयकामध्ये डिसेंबर, 2014 मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या असून; उत्पादन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या राज्यांनी व्यक्त केलेल्या चिंतांवरही उपाययोजना करण्यात आली आहे 
* करव्यवस्थेच्या सार्वत्रिकीकरणामधून भारत एक आर्थिक बाजारपेठ म्हणून उदयास येण्यास मदत होईल 
* जीएसटीमुळे देशभरात मालाची आवकजावक सुलभ पद्धतीने होईल 
* या विधेयकामुळे राज्ये अधिक सक्षम होतील. केंद्राबरोबरच राज्यांना मिळणाऱ्या महसूलामध्येही वाढ होईल. या विधेयकामुळे "करावर कर‘ न लागू देण्याची खबरदारी घेता येईल 
* जीसटीमुळे सध्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेस नवी उर्जा मिळेल
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST

फोटो गॅलरी