कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून तीने कुस्ती संकुल सुरू करायचं ठरवलं! पण झालं असं की...

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

शिवछत्रपती पुरस्कार विजेती कौशल्या वाघ हीने कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून कुस्ती संकुल जूनपासून सुरु करण्याचे ठरवले होते, पण जोरदार अवकाळी पावसाने तिचे सांगली जिल्ह्यात साकारत असलेले संकुल नीट उभे उभे राहण्यापूर्वीच जोरदार पावसाने कोलमडले आहे. 

 

मुंबई ः शिवछत्रपती पुरस्कार विजेती कौशल्या वाघ हीने कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून कुस्ती संकुल जूनपासून सुरु करण्याचे ठरवले होते, पण जोरदार अवकाळी पावसाने तिचे सांगली जिल्ह्यात साकारत असलेले संकुल नीट उभे उभे राहण्यापूर्वीच जोरदार पावसाने कोलमडले आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

ग्रामीण भागातील मुलींनी कुस्तीत नावलौकिक मिळवावा यासाठी मी हे संकुल सुरु करण्याचे ठरवले होते, त्यासाठी काही मदत मिळवली होती. ती कमी पडत असल्यामुळे दागिने गहाण ठेवले होते. त्याचे दोन वर्षापासून सुरु असलेले काम आता पूर्ण होत आले होते, पण आता सगळेच पडले आहे, जवळपास दहा लाख रुपये त्यात घातले होते. सगळी ताकद पणास लावली होती, पण आता काय अशी खेदपूर्वक विचारणा कौशल्याने केली. 
सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील कडेगाव तालुक्याच्या उत्तरेस रायगाव हे छोटेस गाव आहे. त्यात या कुस्ती संकुलाचे काम सुरु होते. त्यातून या भागातील मुलींनी कुस्तीचे अद्यावत धडे देण्याचा तिचा विचार होता. संकुलासाठीचे साहित्यही आले होते. जूनपासून संकुल सुरु करण्याचे स्वप्न कौशल्या बघत होती, पण या स्वप्नावर पाणी फिरले. 

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वे ट्रेन्सचं बुकिंग सुरु, 'हे' आहेत नियम, 'असं' करा तिकीट बुक

दोन दिवस खूप वादळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक झाडही पडली. तालमीचे काम खूपसे झाले होते. भिंती बऱ्यापैकी होत आल्या होत्या, पण काही फूटावरचे दिसणार नाही एवढा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एका पाठोपाठ भिंती पडल्या. पूर्ण होत आलेले स्वच्छतागृहही पडले. अवघ्या काही तासात सर्व काही सपाट झाले, असे तिने सांगितले.  

खर तर एप्रिल किंवा मेमध्ये प्रशिक्षण सुरु करायचा विचार होता. लॉकडाऊनमुळे काम थांबले होते. अखेरच्या टप्प्याचे काम सुरु झाले होते. पण त्यादिवशी पावसाळी हवा होती, त्यामुळे कोणी कामाला आले नाही आणि दोन दिवसात हे असे झाले. खूप मेहनतीने पैसे जमा केले होते, पण आता प्रशिक्षण सुरु कसे करणार हा प्रश्न कौशल्यासमोर आहे. आता आपल्या अकादमीसाठी आर्थिक मदत करावी, शासनाने साह्य करावे अशी तिची अपेक्षा आहे. पण सध्या कोरोनाची साथ आहे. सरकारचे तिकडे जास्त लक्ष आहे. आपण त्यामुळे मदतीची अपेक्षा तरी जास्त कशी बाळगणार कोरोनामुळे माणूस जगतो की काय हा प्रश्न आहे, त्यावेळी जास्त अपेक्षा तरी कशी बाळगणार अशी तिने खेदपूर्वक विचारणार केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Her complex in Sangli district has collapsed due to heavy rains.