राज्य कबड्डी उपाध्यक्ष ठाण्यात पराजित

राज्य कबड्डी उपाध्यक्ष ठाण्यात पराजित

मुंबई: काही वर्षांपूर्वी राज्य कबड्डी संघटनेचे कार्यवाह असलेले रमेश देवाडीकर हे ठाणे जिल्हा कबड्डी निवडणुकीत पराजित झाले होते. आता राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष असलेले देवराम भोईर यांना ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. 

भोईर हे राज्य कबड्डी संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष होते. राज्य कबड्डी संघटनेची कार्यकारिणी शिस्तपालन समितीच्या शिफारसी स्वीकार करीत असतानाच ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेची निवडणूक झाली. त्यात कृष्णा पाटील यांनी भोईर यांना ३०३-२३१ असे हरवले.

यापूर्वीच्या निवडणुकीतील पराभवामुळे देवाडीकर यांना राज्य कबड्डीतील पद गमवावे लागले होते, याची आठवण करून दिल्यावर प्रतिस्पर्धी गटांनी आमचे निवडणुकीपुरतेच मतभेद आहेत. राज्यातील प्रतिनिधींबाबत कोणताही वाद होणार नाही, असे सांगितले होते.

कृष्णा पाटील यांचे धर्मवीर कबड्डी विकास पॅनेल होते; तर भोईर यांचे देवराम भोईर कबड्डी विकास पॅनेल. या निवडणुकीत पाटील यांच्या पॅनेलनेच पूर्ण हुकुमत राखली. कार्याध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धर्मवीर पॅनेलच्या मनोज पाटील यांनी भूषण पाटील यांचा ३५८-१७० असा; तर मालोजी भोसले यांनी सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत अजय म्हात्रे यांचा ३३३-१९१ असा पराभव केला, तसेच कोषाध्यक्ष निवडणुकीत मावळत्या कार्यकारिणीत सचिव असलेले शशिकांत ठाकूर यांना रतन पाटील यांच्याविरुद्ध १४५-३८३ अशी हार पत्करावी लागली.

अन्य पदांचे निकाल ः- सहचिटणीस (४ पदे), विजयी ः भगीरथ पाटील (३९०), राजेंद्र मुणनकर (३६७), सुरेश तरे (३८७), विशाल गलुगडे (३४६). पराजित ः अरुण म्हात्रे (१५९), जितेंद्र तरे (१४३), प्रेमनाथ पाटील (१३८), पुंडलिक गोरले (१४०). विजयी सदस्य ः दीपक म्हात्रे, देवानंद पाटील, लीना कांबळे, पंकज चव्हाण, प्रवीण दळवी, रोशन म्हात्रे, संदीप शिकारे, सत्यवान जाधव, शिवदास पाटील, विकास पवार. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com