स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत आदर्श काॅम्प्युटर्स अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

सातारा - सुजित उबाळे व साबीर महत यांच्या चौफेर फटकेबाजीमुळे आदर्श कॉम्प्युटर क्रिकेट संघाने आर. सी. अकादमीवर सात गडी राखून विजय मिळवित स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
स्टार क्रिकेट क्‍लब आयोजित स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांना आज (शुक्रवार) प्रारंभ झाला. आदर्श संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

आर. सी. अकादमीने "आदर्श' समोर 178 धावांचे आव्हान उभे केले. "आदर्श'च्या सुजित उबाळे व साबीर महत या सलामीच्या जोडीने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. सुजित व साबीरने 120 धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
सुजितने 28 चेंडूंत चार षटकार 11 चौकारांसह 76 धावा केल्या. साबीरने 35 चेंडूंत चार षटकारांसह 10 चौकार ठोकत 81 धावा केल्या. आदर्श संघातील सागर जाधव नाबाद 10 व नितीन बारपतेने नाबाद सहा धावा केल्या.
आर. सी. च्या प्रथमेश पाटील, आर्य शहा, तसेच अभिमन्यू जाधवने प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी आर. सी. ने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 178 धावा केल्या. रणजित चव्हाणने 28 चेंडूंत आठ चौकारांसह 40 धावा, सिद्धांत दोशीने 28 चेंडूंत 5 चौकारांसह 34, अभिमन्यू जाधवने 24 चेंडूंत तीन चौकारांसह 30, आर्य शहाने 11 चेंडूंत एक चौकर ठोकत 11, तसेच शिवम ठोंबरेने 14 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 17 आणि कमलेश लांजेकरने 14 चेंडूंत दोन षटकारांसह तीन चौकार ठोकून 30 धावा केल्या.
"आदर्श'च्या सचिन भोसलेने 3 षटकांत 27 धावांत 2, रमेश सूरने 4 षटकांत 22 धावांत 2, तसेच नितीन बारपतेने 3 षटकांत 35 धावांत 2 गडी बाद केले. "आदर्श'चा साबीर महत सामनावीर ठरला. दरम्यान दुपारच्या सत्रात मराठा जिमखाना व अमराई स्ट्रायकर्स यांच्यात दुसऱ्या उपांत्य फेरीची लढत होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adarsh Computer Enter's in Star Cricket Club T-20 Final