राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीचे सुवर्ण यश

संदीप खांडेकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

कोल्हापूर - गोल्ड  कोस्ट (आॅस्ट्रेलिया) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत-दरेकर हिने सुवर्णपदक पटकावताच तिच्या कुटुंबीयांनी आज सकाळी जल्लोष केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

कोल्हापूर - गोल्ड  कोस्ट (आॅस्ट्रेलिया) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत-दरेकर हिने सुवर्णपदक पटकावताच तिच्या कुटुंबीयांनी आज सकाळी जल्लोष केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

काल तिने रौप्य पदक पटकावले होते. आज तिने ५० मीटर रायफल प्रकारात अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावून कोल्हापूरचा झेंडा फडकावला. राष्ट्रकुल स्पर्धेतील तिच्या सुवर्णपदकांची संख्या तीन झाली आहे. 

तेजस्विनीची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी अशी :
२००६ - आॅस्ट्रेलिया - २ सुवर्ण.
२०१० - दिल्ली - २ रौप्य, २ कास्य.
२०१८ - गोल्ड‌‌ कोस्ट‌- १ सुवर्ण, १ रौप्य.
 

ऑस्ट्रेलिया येथील गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत-दरेकरने सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके पटकावून देशाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे. तेजस्विनीची नेमबाजीतील सातत्यपूर्ण कामगिरी अभिमानाची बाब आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना तिला मदतीचा हाथ दिला. तिने कष्ट, सराव व चिकाटीने त्याचे चीज केले.
- चंद्रकांत पाटील,
पालकमंत्री

तेजस्विनीच्या घरी आनंदोत्सव!
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत-दरेकरने सुवर्ण पदक पटकावताच तिच्या कुटुंबीयांच्या आनंदोत्सवास उधाण आले. तेजस्विनीचे यश त्यांनी आतषबाजी करून साजरे केले. तेजस्विनीने तीन राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण आठ पदके पटकावली असून त्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य व दोन ब्राँझपदकांचा समावेश आहे. तिने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात यश मिळवले. नेमबाजीत सातत्यपूर्ण कामगिरी हे तिचे वैशिष्ट्य आहे.

२०१६ ला लग्न झाल्यानंतरही ती राष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवत राहिली. तिचा २००४ पासून नेमबाजीत सुरू झालेला प्रवास आजही सुवर्णमय राहिला आहे. केरळमध्ये २०१५ला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण, रांचीतील २०११ला चार सुवर्ण, तर गुवाहाटीतील २००७ मधील स्पर्धेत सात सुवर्णपदके पटकावली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर म्युनिक (जर्मनी) येथे २०१०मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ५० मीटर प्रोन प्रकारात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला होता.

 

Web Title: Kolhapur News Tejaswini Sawant Gold Medal