मलिका, सराह अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

पुणे - डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित एचएसबीसी रोड टू. विंबल्डन २०१७ टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मलिका मराठे, पंजाबच्या सराह देव, तमिळनाडूच्या व्हीएम संदीप आणि दिवेश गेहलोटने अंतिम फेरी गाठली आहे.  

पुणे - डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित एचएसबीसी रोड टू. विंबल्डन २०१७ टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मलिका मराठे, पंजाबच्या सराह देव, तमिळनाडूच्या व्हीएम संदीप आणि दिवेश गेहलोटने अंतिम फेरी गाठली आहे.  

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत  एकेरीत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित मलिका मराठेने आपली विजयी मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित व आपलीच राज्य सहकारी गार्गी पवारचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६(१)असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत तिची लढत पंजाबच्या दुसऱ्या मानांकित सराह देव बरोबर होणार आहे. सराह देवने हरियानाच्या चौथ्या मानांकित संदिप्ती सिंग रावचा ६-१, ६-४ असा पराभव केला.  मुलांच्या गटात उपांत्य फेरीत एकेरीत तमिळनाडूच्या व अव्वल मानांकित व्ही.एम. संदीपने चौथ्या मानांकित व हरयाणाच्या अजय मलिकचे आव्हान ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले. हरियानाच्या व दुसऱ्या मानांकित दिवेश गेहलोटने दिल्लीच्या  तिसऱ्या मानांकित निशांत दबसचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

निकाल असे ः उपांत्य फेरी ः मुले ः व्ही.एम. संदीप (तमिळनाडू) वि.वि. अजय मलिक (हरियाना) ६-४, ६-२; दिवेश गेहलोट (हरियाना) वि.वि. निशांत दबस (दिल्ली) ६-३, ६-४; मुली ः मलिका मराठे (महाराष्ट्र) वि.वि. गार्गी पवार (महाराष्ट्र) ६-३, ७-६(१); सराह देव (पंजाब) वि.वि. संदिप्ती सिंगराव (हरियाना) ६-१, ६-४. 

Web Title: Malika, Sarah final