सेरेना-केर्बर अंतिम लढत

वृत्तसंस्था
Friday, 13 July 2018

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपले ग्रॅंड स्लॅम पुनरागमन विंबल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश करून साजरे केले. विजेतेपदासाठी तिची गाठ आता जर्मनीच्या एंजेलिक केर्बरशी पडेल. 

लंडन : अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपले ग्रॅंड स्लॅम पुनरागमन विंबल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश करून साजरे केले. विजेतेपदासाठी तिची गाठ आता जर्मनीच्या एंजेलिक केर्बरशी पडेल. 
सेरेना आणि केर्बर यांचे विजय सहज झाले. दोघींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखले. सेरेनाने आठव्या विजेतेपदाकडे पाऊल टाकताना जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेस हिचा 6-2, 6-4 असा पराभव केला. 

विजेतेपदाच्या लढतीमधील तिची प्रतिस्पर्धी एंजेलिक केर्बर हिने लॅटवियाच्या येलेना ओस्टापेन्को हिचा 6-3, 6-3 असा पराभव केला. केर्बरने लढत 68; तर सेरेनाने 70 मिनिटांत जिंकली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serena Williams and Angelique Kerber into Wimbledon Final