जपानची नाओ हिबीनो उपांत्य फेरीत दाखल

पीटीआय
Sunday, 30 July 2017

नॅनचॅंग  - जपानच्या नाओ हिबीनो हिने जियांगझी डब्ल्यूटीए ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आगेकूच केलेल्या इतर तिन्ही खेळाडू चीनच्या आहेत. हिबीनो हिने चीनच्या ल्यू जिंग-जिंग हिचे आव्हान ६-२, ६-३ असे परतावून लावले. तिची चीनच्या वॅंग याफानशी लढत होईल. वॅंगने तैवानच्या ह्‌सिह स्यू-वेई हिला ७-६ (९-७), ६-० असे पराभूत केले. द्वितीय मानांकित पेंग शुआई आणि हॅन झिनयुआन यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होईल. शुआईने चीनच्याच झू लिन हिला ७-६ (७-२), ६-०, तर हॅनने ऑस्ट्रेलियाच्या अरीना रोडीओनोवाला ६-१, ७-५ असे हरविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Nao Hibino tennis