अमेरिकेच्या सॅम क्वेरीची सनसनाटी कामगिरी 

पीटीआय
Thursday, 13 July 2017

लंडन - गतविजेत्या अँडी मरेला यंदाच्या विंबल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या २४ व्या मानांकित सॅम क्वेरी याने त्याचे आव्हान पाच सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत ३-६, ६-४, ६-७(४-७), ६-१, ६-१ असे संपुष्टात आणले. 

मरेपाठोपाठ काल रॅफेल नदालचे आव्हान संपुष्टात आणणाऱ्या जिल्स म्युलरलाही पराभवाचा सामना करावा लागला. सातव्या मानांकित मरिन चिलीचने त्याचा ३-६, ७-६(८-६), ७-५, ५-७, ६-१ असा पराभव केला. 

क्वेरीने कारकिर्दीत ४२व्या प्रयत्नांनंतर एखाद्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याची गाठ आता माजी अमेरिकन विजेत्या मरिन चिलीचशी पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कमरेच्या दुखापतीने बेजार असलेल्या मरेची हालचाल योग्य होत नव्हती. त्यात त्याच्या उजवा पाय दुखावला आणि होणाऱ्या वेदनामुळे तो पूर्ण क्षमतेने खेळू शकला नाही. त्याचा फायदा क्वेरीने अचूक उचलला. अखेरच्या दोन सेटमध्ये तर त्याने मरेला संधीच दिली नाही. क्वेरीने ७० विजयी फटके मारले. त्याने २७ बिनतोड सर्व्हिसही केल्या. क्वेरी २००९ नंतर विंबल्डनची उपांत्य फेरी गाठताना पहिला अमेरिकन टेनिसपटू ठरला. त्या वेळी अँडी रॉडिक उपविजेता ठरला होता. 

मरेने पहिल्या सेटमध्ये आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला होता. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याने ४-३ अशी आघाडी घेतली होती. पण, त्यानंतर क्वेरीने अनपेक्षितपणे झुंज देत सलग तीन गेम जिंकून दुसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्ये मरेने पुन्हा एकदा जोरकस खेळ करून टायब्रेकरमध्ये क्वेरीवर मात केली. चौथ्या सेटपासून मात्र पायाच्या दुखापतीने मरे बेजार झाला. त्याला वेदना असह्य होऊ लागल्या. त्याच्या हालचाली मंदावल्या आणि त्याचा फायदा क्वेरीने अचूक उचलला. तुफानी सर्व्हिस करून त्याने मरेवरील दडपण वाढवले. क्वेरीने २२ मिनिटांत तीन वेळी मरेची सर्व्हिस ब्रेक करत चौथा सेट जिंकला. पाचवा सेट चौथ्या सेटचा ॲक्‍शन रिप्ले ठरला. फरक इतकाच की पाचवा सेट २७ मिनिटे चालला आणि क्वेरीच्या सर्व्हिसवर मरे केवळ एकच गुण मिळवू शकला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Sam Querrey Andy Murray wimbledon 2017