कॅरोलीनकडून सालसाला शाबसकी अन्‌ रॅकेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पुणे - पुण्याची टेनिसपटू सालसा आहेर हिला डब्ल्यूटीए फ्युचर स्टार्स टेनिस स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरीबद्दल फ्रान्सची नामवंत टेनिसपटू कॅरोलीन गार्सिया हिच्याकडून शाबासकी; तसेच रॅकेट बक्षीस मिळाली. उपांत्य फेरीत सालसाला तैवानच्या या-ह्‌सीन ली हिने ४-६, ६-२, १०-७ असे हरविले. कॅरोलीन जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. सालसाने गटातील पाचही सामने जिंकले होते. उपांत्य फेरी गाठलेल्या स्पर्धकांची संयोजकांनी कॅरोलनशी भेट आयोजित केली होती. कॅरोलीनने सालसाला ऑटोग्राफ करून रॅकेट दिली. वेल डन-गुड लक, असे म्हणत तिने सालसाला प्रेरीत केले. सालसा यामुळे भारावून गेली होती.

Web Title: sports news tennis Salsa Aher

टॅग्स