अपघाताच्या प्रश्‍नांनी व्हिनसला रडू कोसळले

पीटीआय
Wednesday, 5 July 2017

लंडन - व्हिनस विल्यम्सच्या मोटारीच्या अपघातात ७८ वर्षीय बुजुर्गाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. याबाबतच्या प्रश्‍नांना उत्तर देताना व्हिनस विल्यम्सला आज रडूच कोसळले.

व्हिनसने विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या एलिस मेर्टेन्स हिला हरवले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत व्हिनसला अपघाताबाबतच जास्त प्रश्‍न विचारण्यात आले. ‘‘त्याबाबत काय बोलणार, मला काहीच सूचत नाही. काय बोलू मी,’’ असे सांगताना व्हिनसला रडू कोसळले आणि रूमबाहेर निघून गेली; पण पाचच मिनिटांत परतली.

फ्लोरिडातील अपघातासाठी पोलिसांनी व्हिनसला जबाबदार धरले आहे. तिला या पत्रकार परिषदेत सुरवातीपासूनच तुझी गेल्या महिन्यातील मनस्थिती कशी होती, याबाबत अनेक प्रश्‍न विचारले गेले. तिने जवळपास सर्वच प्रश्‍नांना बगल दिली. तिने सेरेनाची अनुपस्थिती जाणवत असल्याचे सांगत विषय बदलण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. अखेर तिला याबाबत बोलणे भाग पडले; पण बोलताना तिला रडू कोसळले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Venus Williams