अँडी मरेची आगेकूच

वृत्तसंस्था
Monday, 4 July 2016

लंडन - अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरे याने थाटात विंबल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

तिसऱ्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा 6-3, 7-5, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या तीन वर्षांत मरेला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र, आता त्याच्या मार्गातील एक काटा दूर झाल्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास नक्की दुणावला असेल.

महिला विभागात सिमोना हालेप हिनेदेखील आपली आगेकूच कायम राखली. तिसऱ्या फेरीत तिने नेदरलॅंड्‌सच्या किकी बेर्टेन्स हिचा 6-4, 6-3 असा सहज पराभव केला.

सेरेना, ट्रॉईच्कीला दंड
सेरेना विल्यम्स आणि व्हिक्‍टर ट्रॉईच्की यांना कोर्टवरील असभ्य वर्तनामुळे शनिवारी 10 हजार डॉलरचा दंड करण्यात आला. स्पेनच्या अल्बर्ट रामोर व्हिनोलास विरुद्ध पराभव पत्करावा लागलेल्या ट्रॉईच्कीने मॅचपॉइंट पंचांनी न दिल्यामुळे त्याने आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना पंचांशी हुज्जत घातली आणि रॅकेटदेखील फेकून दिली होती.

सेरेनाने देखील तिसऱ्या फेरीत क्रिस्तिना मॅकहेलविरुद्ध पहिला सेट गमाविल्यानंतर रॅकेट फेकून दिली होती. या दोघांच्याही कृती नियमबाह्य ठरवून संयोजकांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wimbledon 2016: Andy Murray meets Nick Kyrgios