आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरकरांचे जल्लोषात स्वागत

आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरकरांचे जल्लोषात स्वागत

कोल्हापूर - ऑस्ट्रिया येथे झालेली आयर्नमॅन ही स्पर्धा कोल्हापुरातील 11 जणांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यातील वरूण कदम, अमर धामणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, उदय पाटील- बेळगावकर व बाबासाहेब पुजारी या पाच स्पर्धकांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. आयर्नमॅन सत्कार समितीच्यावतीने ताराराणी चौकात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. 

ऑस्ट्रेलिया येथे नुकतीच आयर्न मॅन ही स्पर्धा पार पडली. शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या या स्पर्धेत गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरचा झेंडा फडकत आहे. याहीवर्षी कोल्हापुरातील तेरा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातील 11 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून आयर्न मॅन किताब पटकावला.  3.8 किलोमीटर स्विमिंग 182 किलोमीटर सायकलिंग व 42.2 किलोमीटर रनिंग हे संपूर्ण 17 तासाच्या आत या स्पर्धकांनी पूर्ण केले.

ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी  करण्यासाठी स्पर्धकांनी दोन वर्ष कठोर सराव केला व ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना निळकंठ आरवाडे,( स्विमिंग) धीरज व पंकज रावळू व अश्विन भोसले यांनी मार्गदर्शन केले.यामधील मागील वर्षाचे आयर्न मॅन चेतन चव्हाण यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा पूर्ण केलेले वरूण कदम, अमर धामणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, उदय पाटील-बेळगावकर व बाबासाहेब पुजारी यांचे कोल्हापुरात आगमन झाले.  

आयर्न मॅन सत्कार समितीचे अध्यक्ष जयेश कदम यांच्यासह प्रशिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत या यशस्वी स्पर्धकांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. स्पर्धकांच्या कुटुंबीय नातेवाईक आणि त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

यानंतर या सर्वांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम ही येथे झाला. यावेळी सकाळचे उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, उद्योगपती दिनेश बुधले, आयर्न मॅन रौनक पाटील, विनोद चंदवाणी, अभिजीत डुबल, राजेंद्र किंकर, डॉ. सरोज शिंदे, डॉ. प्राजंली धामणे, सत्यजित पाटील, संजय खानोलकर,संजय पवार,राजु शेट्ये, डॉ. हेमंत कांदेकर, चेतन चव्हाण, एस आर पाटील, ऍडव्होकेट राजेंद्र किंकर, सचिन तोडकर ,दिलीप देसाई, राजू लिंग्रज, बाळासाहेब मुधोळकर ,गणी आजरेकर, रत्नेश शिरोळकर, अश्विन भोसले आदीसह स्पर्धकांचे कुटुंबीय नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com