११ गुणांच्या पद्धतीला बॅडमिंटनमध्ये फुलीच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नवी दिल्ली -  बॅडमिंटचा गेम कमी वेळेत संपावा आणि पर्यायाने जास्त प्रेक्षक आकर्षित व्हावेत म्हणून जागतिक शिखर संघटनेने केलेला प्रयोग फसला आहे. ११ गुणांच्या सर्वोत्तम पाच सेटच्या लढतीवर अखेर फुलीच मारली गेली. दोन तृतीयांश बहुमताअभावी ही पद्धत रद्द करणे जागतिक बॅडमिंटन महासंघाला (‘बीडब्ल्यूएफ’) भाग पडले.

या प्रयोगाविषयी बहुतांश खेळाडू तसेच संघटनांनी यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संघटनेच्या ‘फेसबुक’वरील अधिकृत ‘पेज’नुसार आलेले हे वृत्त त्यामुळे अपेक्षितच होते. सध्या २१ गुणांच्या सर्वोत्तम तीन गेमच्या लढती होतात. हीच पद्धत कायम राहील. नव्या प्रयोगास १२३ जणांनी विरोध दर्शविला होता, पण त्या तुलनेत सहा जास्त म्हणजे १२९ मते मिळाली. दोन तृतीयांश बहुमताचा आकडा मात्र लांब राहिला.

नव्या पद्धतीमुळे बॅडमिंटनमधील शारीरिक क्षमता आणि संघर्षाचा पैलू झाकोळला गेला असता. त्यामुळे सामन्यातील रंगत कमीच झाली असती. पाच गेम असले तरी ११ गुणांच्या स्वरूपामुळे शारीरिक मुद्यावर परिणाम झाला असता. मुख्य म्हणजे ऑलिंपिकच्या दृष्टीने हे बदल फार घाईचे ठरले असते. दोन खेळाडूंच्या दर्जात फार फरक असेल तर सामने कंटाळवाणे झाले असते.
- व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन, अव्वल बॅडमिंटनपटू

Web Title: 11-point pattern is in full swing in Badminton