VIDEO : फिल्डर्संनी बॉलरलाच बाउंड्री अडवायला पळवलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand vs Bangladesh

बांगलादेशचा इबादत हुसैन याच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या खराब क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला.

VIDEO : फिल्डर्संनी बॉलरलाच बाउंड्री अडवायला पळवलं!

बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात (New Zealand vs Bangladesh) आपल्याच बॉलरची फजिती करुन संघाचं हसू करुन घेतले. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशनं न्यूझीलंडला पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर दोन संघामधील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना सामना Hagley Oval, Christchurch च्या मैदानात रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाने दमदार कमबॅक केले. पहिल्या दिवशीच्या खेळात न्यूझीलंडने 1 बाद 349 धावा केल्या आहेत.

बांगलादेशचा (Bangladesh) इबादत हुसैन याच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या खराब क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला. विल यंग (Will Young) 26 धावांवर खेळत होता. इबादनं (Ebadot Hossain) टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेनं गेला. स्लिपच्या खेळाडूला तो चेंडू अडवता आला नाही. त्यामुळे चेंडू सीमारेषेकडे गेला. फिल्डर चेंडू अडवून पुन्हा टाकण्याआधी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पळून तीन धावा केल्या. त्यानंतर ढिसाळ क्षेत्रक्षणाचा नजराणा अनुभवायला मिळाला.

हेही वाचा: AUS vs ENG: इंग्लंडच्या शेपटानं कांगारुंचा चौकार अडवला; मॅच ड्रॉ

हेही वाचा: VIDEO : एका ओव्हरमध्ये दोनदा LBW; त्यानंतर कुटल्या नाबाद 186 धावा

फिल्डिंगमधील गोंधळात सीमारेषेवरुन आलेला बॉल पुन्हा सीमारेषकडे गेला. यावेळी बॉलरला स्वत: चार धावा रोखण्यासाठी पळावे लागले. पण तो यात अपयशी ठरला. त्यामुळे ज्या चेंडूवर एकही धाव मिळायला नको होती त्या चेंडूवर न्यूझीलंडला सात धावा मिळाल्या. यात ओव्हर थ्रोच्या रुपातील बाउंड्रीचा समावेश होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. अंपायरही या प्रकारानंतर हसताना पाहायला मिळाले.

दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गाजवला. 90 षटकांच्या संपूर्ण खेळात न्यूझीलंडने 1 बाद 349 धावा केल्या. दिवसाअखेर टॉम लॅथम (Tom Latham) 186 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूला डेवॉन कॉन्वेनं 99 धावांवर खेळत होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top