सचिनने आजच्याच दिवशी केली होती एंट्री आणि एक्झीट; सचिनच्या इंटरनॅशनल कारकिर्दीचा आढावा

sachin tendulkar
sachin tendulkar

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या सचिन तेंडूलकरने आजच्याच दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 1989 रोजी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. इतकंच नव्हे तर 2013 मध्ये सचिनने आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच देखील आजच्याच दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर खेळली होती. भारतीय क्रिकेट बोर्डाने सचिनच्या पहिल्या आणि शेवटच्या इंटरनॅशनल मॅचचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच लाखो लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी BCCI ने आभार मानले आहेत. BCCI चे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 

सचिन तेंडूलकरने आपल्या पहिल्या इंटरनॅशनल मॅचमध्ये 15 धावा केल्या होत्या. त्यांना वकार यूनुसने आऊट केलं होतं. तर त्यांच्या शेवटच्या इंटरनॅशनल मॅचमध्ये सचिनचा कॅच डॅरेन सॅमीने स्लिपमध्ये पकडला होता. सचिनने 74 धावांची खेळी केली होती. सचिनने आपल्या अनोख्या शैलीतील खेळाने आपल्या फॅन्सचे हृदय जिंकले आहे. इतकं की त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. सचिन हा असा एकमेव क्रिकेटर आहे ज्याने 100 इटरनॅशनल शतक केले आहेत. सचिनने 51 टेस्ट शतक केले आहे तर 49 वनडे शतक केले आहेत. सचिनने 24 वर्षे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घालवली आहेत. आपल्या करीअरच्या दरम्यान सचिनने 6 वेळा वर्ल्ड कप खेळला आहे, जोदेखील एक रेकॉर्डच आहे. 

सचिनचे वर्ल्ड कप जिकंण्याचे स्वप्न 2011 मध्ये पूर्ण झालं. भारताने तेंव्हा श्रीलंकेला हरवून 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला होता. सचिनने 2010 मध्ये पहिल्यांदा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक मारले होते. पहिले द्विशतक करणारा सचिन हा पहिला खेळाडू आहे. सचिनने दक्षिणा अफ्रिकेविरोधात हा विक्रम केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com