डोपिंग केल्यास चार वर्षांऐवजी तीन वर्षांची बंदी ; तीन वेटलिफ्टर्सचाही समावेश

चार वर्षांऐवजी तीन वर्षांची बंदी; तीन वेटलिफ्टर्सचाही समावेश
weightlifting
weightlifting sakal

नवी दिल्ली : गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या अकरा खेळाडूंनी डोपिंग केल्याचे सिद्ध झाल्याने तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, या खेळाडूंनी डोपिंग केल्याचे लगेच मान्य केल्याने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) त्यांच्यावर चार वर्षांऐवजी तीन वर्षांची बंदी घातली आहे. यात ॲथलेटिक्सच्या तीन खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश आहे.

ही बंदी ६ डिसेंबर २०२३ पासून सुरू झाली आहे. कमलजित कौर, अजय कुमार आणि हरजोधवीर या तीन खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला होता. ज्यांच्यावर चारऐवजी तीन वर्षांची बंदी टाकण्यात आली आहे, अशा नाडाच्या यादीत या तिघांच्या नावाचा उल्लेख आहे.

पंजाबच्या कमलजित कौर हिने १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेतला होता. २०० मीटरमध्ये तिने २३.८४ सेकंदासह रौप्यपदक जिंकले होते; तर १०० मीटरमध्ये तिला सहावे स्थान मिळाले होते. तिच्या नमुन्यात ड्रोस्टॅनोलोन हे सिंथेटिक ॲनाबोलिक स्टेरॉईड सापडल्याचे नाडाने म्हटले आहे. केस निकाली काढण्याचा करार या अंतर्गत तिच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.

यजमान गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजय कुमारने पाच हजार मीटर शर्यतीत १४ मिनिटे १३.३३ सेकंदात ब्राँझ जिंकले होते; तर दहा हजार मीटर शर्यतीत सहावे स्थान मिळविले होते. त्याच्या नमुन्यात डार्बेपोटीन व मोर्फिन आढळून आले. पंजाबचा हरजोधवीर सिंग पाच हजार मीटर शर्यतीत पाचव्या स्थानावर होता; तर दहा हजार मीटर शर्यत तो पूर्ण करू शकला नव्हता. त्याच्याही नमुन्यात डार्बेपोटीन व मोर्फिन आढळून आले. नाडाच्या नियमाप्रमाणे या खेळाडूंवर चार वर्षांची बंदी घातली असती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com