
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडनेकांस्यपदक संपादन केले.
निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्यातील खडकाळ मार्गावरील सात फेर्यांची शर्यत प्रणिता सोमणने एक तास 22 मिनिटे 10.818 सेकंदात पूर्ण केली. तिची सहकारी व नाशिकची खेळाडू ऋतिका गायकवाड हिने कांस्यपदक जिंकताना हेच अंतर एक तास 27 मिनिटे 5.623 सेकंदात पार केले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच माउंटन बाईकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रणिता हिने क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. टाईम ट्रायलमधील अव्वल यशामुळे आज तिने अतिशय आत्मविश्वासाने ही शर्यत जिंकली.