
नाशिकची संजीवनी जाधव हिने महिलांच्या ५ हजार मिटर शर्यतीत रौप्य, तर पूनम सोनूने हिने कांस्यपदक जिंकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये आजचा दिवस गाजवला.
याचबरोबर महिलांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतीत नेहा ढाबरे हिने कांस्यपदकाची कमाई केली, तर पुरुषांच्या ४०० मिटर शर्यतीत बिद्री (कोल्हापूर) येथील रोहन कांबळे यालाही कांस्यपदक मिळाले.