Weightlifting Video: मूर्ती लहान, पण कीर्ती महान! अवघ्या 9 वर्षांच्या अर्शियाने उचलले 75 किलो वजन

Arshia Goswami Weightlifting: भारताची 9 वर्षांची अर्शिया गोस्वामी हिने 75 किलो वजन उचलत अनेकांचे लक्ष वेधले आहे. तिचा वेटलिफ्टिंगचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Arshia Goswami Weightlifting
Arshia Goswami WeightliftingInstagram/fit_arshia

Arshia Goswami Weightlifting: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ आहे 9 वर्षांच्या अर्शिया गोस्वामी हिचा. ती युवा वेटलिफ्टर असून तिच्या नावावर काही विक्रमही आहेत.

नुकताच तिचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. यामध्ये ती तब्बल 75 किलो डेडलिफ्ट करताना दिसत आहे. ती अगदीच सहजतेने 75 किलो वजन उचलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Arshia Goswami Weightlifting
IND vs AUS : मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढणार; भारत- ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरी हॉकी लढत

खरंतर हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 29 फेब्रुवारी रोजीच शेअर करण्यात आला होता, पण तो व्हिडिओ अनेकांच्या नजरेत नुकताच गेल्या काही दिवसात आल्याने त्याची चर्चा होत आहे. अनेकांनी तिने 75 किलो डेडलिफ्ट करणे हे अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओला 22 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. 48 मिलियनहून अधिक व्ह्युज आले आहेत. तिच्या या अकाऊंटवर तिचे याव्यतिरिक्तही अनेक वेटलिफ्टिंगचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

Arshia Goswami Weightlifting
PBKS vs SRH: भूवीची रणनीती अन् क्लासेनची सुपरफास्ट स्टम्पिंग, असा झाला शिखर धवन 'स्टंप आऊट'; पाहा Video

अर्शिया ही हरियाणातील पंचकुला येथील असून ती गेल्या काही वर्षांपासून वेटलिफ्टिंग करत आहे. तिने गेल्या काही वर्षात वेटलिफ्टिंगमध्ये दाखवलेल्या तिच्या ताकदीने आणि समर्पणाने तिचे कौतुक होत आहे.

तिने 2021 साली जेव्हा वयाच्या 6 व्या वर्षीय 45 किलो वजन उतलले होते, त्यावेळी ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी ती सर्वात युवा डेडलिफ्टर ठरली होती. तिने २०२३ मध्ये 60 किलो वजन उचलत पुढचे पाऊल टाकले होते. आता तिने अगदी सहजतेने ७५ किलो वजन उचलले आहे.

तिने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये असेही सांगितले होते की भारताची ऑलिम्पिक पदकविजेती मिराबाई चानू ही तिची आदर्श असून तिचीही ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com