Vidit Gujrathi : विदीत गुजराथीचा सनसनाटी विजय ; कँडिडेट्‌स बुद्धिबळ,प्रज्ञानंदवर गुकेशची मात

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या हिकारू नाकामुराचा बचाव भेदत भारताचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथीने कँडिडेट्‌स बुद्धिबळमध्ये सनसनाटी विजय मिळवला, तर आर. प्रज्ञानंद आपल्याच देशाच्या डी गुकेशकडून दुसऱ्या फेरीत पराभूत झाला.
Vidit Gujrathi
Vidit Gujrathisakal

टोरांटो : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या हिकारू नाकामुराचा बचाव भेदत भारताचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथीने कँडिडेट्‌स बुद्धिबळमध्ये सनसनाटी विजय मिळवला, तर आर. प्रज्ञानंद आपल्याच देशाच्या डी गुकेशकडून दुसऱ्या फेरीत पराभूत झाला. पहिल्या फेरीतील चारही अनिर्णित डावांनंतर आजचे दुसऱ्या फेरीतील चारही डाव निकाली ठरले. अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना अझरबैजानच्या निजात आबासोव याच्यावर शानदार विजय मिळवला.

महिलांच्या दुसऱ्या फेरीत आर. वैशालीला चीनच्या झोंगयी टॅन हिच्याकडून कडवा संघर्ष केल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या कोनेर हम्पीने रशियाच्या कॅटेरिना लागनोविरुद्धचा डाव अनिर्णित सोडवला.,विदीत, कारुआना, गुकेश आणि नेपोम्नियाची यांनी प्रत्येकी १.५ गुणांची कमाई करत संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. तर प्रज्ञानंद, नाकामुरा दुसऱ्या स्थानावर आहेत.

महिलांमध्ये मात्र चीनच्या झोंगयी टॅन हिने स्वतंत्रपणे आघाडी घेतली आहे. सलग दुसऱ्या डावात त्याने विजय मिळवला आहे. भारताची हम्पी, सालिमोवा आणि लँगो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर वैशालीला संयुक्तपणे सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. एकूण १२ डावांची ही स्पर्धा आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा आहे. यातील विजेता पुढील जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धेत आव्हानवीर असेल.

निकाल : (दुसरी फेरी)

इयान नेपोम्नियाची (१.५) वि.वि. फिरोझा अलिरेझा (०.५) आर प्रज्ञानंद (०.५) पराभूत वि. डी गुकेश (१.५), हिकारू नाकामुरा (०.५) पराभूत वि. विदित गुजराथी (१.५). फॅबियानो कारुआना (१.५) वि.वि. निजात आबासोव (०.५).

महिला : झोंगयी टॅन (२) वि.वि. आर वैशाली (०.५). कॅटेरिना लागनो (१) अनिर्णित वि. कोनेरु हम्पी (१). नुरग्युल सलीमोवा (१) अनिर्णित वि. टिंगकजी लेई (०.५). अलेक्झांड्रा गोर्याचकिना (१.५) वि.वि. ॲना मुझिचुक (०.५).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com