esakal | IPL 2021 : इंग्लिश खेळाडूंना मोजावी लागेल मोठी किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021 : इंग्लिश खेळाडूंना मोजावी लागेल मोठी किंमत

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. युएईच्या मैदानात रंगणाऱ्या या स्पर्धेतून इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतली आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या त्रिकूटानं अगोदरच स्पर्धेत सहभाग घेणार नसल्याचे सांगितले होते. यात डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, आणि क्रिस वोक्सची भर पडली. या तिघांनी वैयक्तिक कारण देत आयत्यावेळी उर्वरित सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द झाला.

कोरोनामुळे सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात असताना या तिघांनी आयपीएलमधून माघार घेतली. त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे क्रिकेट मंडळाचे राजकारण आहे का? अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. इंग्लिश खेळाडूंची ही भूमिका समालोचक आणि क्रिकेटर आकाश चोप्रा यांना खटकली आहे. या तिघांनी अखेरच्या क्षणी फ्रेंचायझी संघाच्या अडचणीत वाढल्या आहेत. याची भविष्यात त्यांना मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल, असे मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: T20 World Cup: 'त्या' फलंदाजाला वगळल्याने माजी क्रिकेटपटू नाराज

आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आयपीएल स्पर्धा आणि इंग्लंड खेळाडूंची भूमिका यावर भाष्य केले आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर ही तिघे स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, हे आधीच स्पष्ट झाले होते. पण मलान, वोक्स आणि बेयरस्टो यांनी आयत्यावेळी स्पर्धेतून काढता पाय घेतला. इंग्लंडचे अर्धा डझन खेळाडूंनी माघार घेतली आहे. आयपीएल फ्रेंचायझी संघ ही गोष्ट विसरणार नाहीत.

हेही वाचा: IPL 2021 : गळती लागली! इंग्लंडच्या त्रिकूटाची स्पर्धेतून माघार

फ्रेंचायझी संघाने आपल्यावर पैसा लावला आहे. याचा विचार इंग्लिश खेळाडूंनी करायला हवा होता. त्यांनी फ्रेंचायझीची फसवणूक केली असून भविष्यात याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. आयपीएलच्या आगामी लिलावावेळी फ्रेंचायझींच्या ही गोष्ट लक्षात असेल. इंग्लंड खेळाडूंनी जो निर्णय घेतलाय त्याचा त्यांना पुढच्या लिलावावेळी फटका बसेल. इंग्लंडच्या खेळाडूंना मोठी बोली लावताना फ्रेंचायझी नक्की विचार करेल, असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.

loading image
go to top