Axar Patel : आकाश चोप्राची 'आकाशवाणी', अक्षरला दिलं आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aakash Chopra Statement About Axar Patel And Kuldeep Yadav After 1st ODI against Zimbabwe

Axar Patel : आकाश चोप्राची 'आकाशवाणी', अक्षरला दिलं आव्हान

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने झिम्बावे विरूद्धच्या पहिल्या सामन्यानंतर अक्षर पटेल आता स्वतःला अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध करून दाखवलं आहे असे वक्तव्य केले. अक्षर पटेलने पहिल्या सामन्यात 7.3 षटकात 24 धावा देत तीन विकेट घेतल्या. भारताने हा सामना 10 विकेट्स राखून जिंकला होता. गेल्या काही सामन्यांपासून अक्षर पटेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चांगले प्रभावित केले आहे. मात्र आकाश चोप्राच्या मते अक्षर पटेलने दमदार कामगिरी जरी केली असली तरी त्याला रविंद्र जडेजाच्या सावलीखालीच रहावे लागणार आहे. जोपर्यंत रविंद्र जडेजा फिट आहे आणि खेळण्यास उपलब्ध आहे अक्षर पटेलला अंतिम 11 च्या संघात स्थान मिळणे कठिण आहे. आता आकाश चोप्राचे हे मत खोडून काढण्याचे आव्हान अक्षर पटेलसोमर असणार आहे. (Aakash Chopra Statement About Axar Patel And Kuldeep Yadav After 1st ODI against Zimbabwe)

हेही वाचा: Asia Cup 2022 : जिंकण्यासाठी बांगलादेश घेणार 'श्रीरामा'ची मदत

आकाश चोप्राने यूट्यूब चॅनलवर सांगितले की अक्षर पटेलच्या उदयाची कहाणी खूप जबरदस्त आहे. अक्षर पटेल असा खेळाडू आहे ज्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून इथं पर्यंत पोहचला आहे. मात्र अजूनही तो रविंद्र जडेजाच्या सावलीत वावरत आहे. जोपर्यंत जडेजा खेळतोय फिट आहे तोपर्यंत अक्षर पटेलला अंतिम 11 च्या संघात स्थान मिळणार नाही. मात्र हे देखील तितकच सत्य आहे की जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे त्याने प्रभावित करणारी कामगिरी केली आहे.'

हेही वाचा: Women's Champions League : मनिषा कल्याण UEFA खेळणारी ठरली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू

झिम्बावेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेलने प्रभावी कामगिरी केली. मात्र दुसरीकडे बऱ्याच काळानंतर संधी मिळालेल्या कुलदीप यादवला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. कुलदीप यादवने 10 षटकात फक्त 36 धावा दिल्या होत्या.

याबाबत आकाश चोप्रा म्हणाला की, कुलदीप यादवला विकेट मिळाल्या नाहीत. कुलदीपकडून तुम्ही विकेट घेण्याची अपेक्षा करता. या खेळपट्टीवर त्याला म्हणावी तशी मदत मिळत नाही. कुलदीप यादवने अजून वेगाने गोलंदाजी केली पाहिजे. आता भारत शनिवारी झिम्बावेशी दुसऱ्या वनडे सामन्यात भिडणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळते की त्याला बाहेर ठेवले जाते ते पहावे लागेल.

Web Title: Aakash Chopra Statement About Axar Patel And Kuldeep Yadav After 1st Odi Against Zimbabwe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..