Asia Cup 2022 : जिंकण्यासाठी बांगलादेश घेणार 'श्रीरामा'ची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Cricket Board Appoint Indias Sreedharan Shriram As Head Coach For Asia Cup 2022 And T20 World Cup

Asia Cup 2022 : जिंकण्यासाठी बांगलादेश घेणार 'श्रीरामा'ची मदत

Asia Cup 2022 : संयुक्त अरब अमिरातीमध्ये येत्या 27 ऑगस्टपासून आशिया कप 2022 ला सुरूवात होत आहे. आशियातील किंग होण्यासाठी सगळे संघ जीव तोडून मेहनत घेत आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आगामी आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतातील श्रीरामची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने भारताची माजी अष्टपैलू खेळाडू श्रीधरन श्रीराम (Sreedharan Shriram) याला आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक (Coach) बनवले आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने श्रीरामची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या वृत्तानुसार हा अधिकारी म्हणतो की 'होय आम्ही वर्ल्ड कपपर्यंत श्रीधरन श्रीराम यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.'

हेही वाचा: Women's Champions League : मनिषा कल्याण UEFA खेळणारी ठरली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा हा अधिकारी पुढे म्हणतो की, 'आम्ही नव्या विचारानिशी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती आशिया कपपासून केली आहे. टी 20 वर्ल्डकप आमचे प्रमुख लक्ष्य आहे. यासाठीच आशिया कपपूर्वी ही नियुक्ती गरजेची होती जेणेकरून त्यांना संघासोबत चांगला वेळ मिळेल.'

श्रीधरन श्रीरामने 2000 ते 2004 दरम्यान, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आठ वनडे सामने खेळले आहेत. याचबरोबर तो ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक फिरकी गोलंदाज प्रशिक्षक देखील राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेल लेहमनच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामवर 2016 मध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती. तो आयपीएलमध्ये आरसीबीसोबत देखील काम करत होता.

हेही वाचा: VIDEO | India Vs Pakistan : शोएबचे दादाच्या बरगड्या होते टार्गेट; पाहा पुढे काय झालं

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जरी एस. श्रीरामची नियुक्ती केली असली तरी दक्षिण आफ्रिकेचे रसेल डोमिंगो कसोटी संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. BCB ने सांगितले की, 'डोमिंगो कसोटी संघाचे मार्गदर्शन करणार आहे. ते आपली भुमिका सध्या तरी यापुढेही पार पाडतील. कारण नोव्हेंबर महिन्यात आम्हाला भारताविरूद्ध एक कसोटी सामना खेळायचा आहे.'

Web Title: Bangladesh Cricket Board Appoint Indias Sreedharan Shriram As Head Coach For Asia Cup 2022 And T20 World Cup

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..