Manisha Kalyan has become the first Indian footballer to play at the UEFA Women's Champions League
Manisha Kalyan has become the first Indian footballer to play at the UEFA Women's Champions Leagueesakal

Women's Champions League : मनिषा कल्याण UEFA खेळणारी ठरली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू

Published on

नवी दिल्ली : भारताची युवा स्ट्रायकर मनिषा कल्याण UEFA महिला चॅम्पियन्स लीग खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे. तिने अपोलोन लेडीज फुटबॉल क्लबकडून एनगोमी साप्रस येथे सुरू असलेल्या युरोपियन क्लब स्पर्धेत पदार्पण केले. कल्याणने माकारियो स्टेडियममधील सामन्यात सायप्रसच्या मारिलेना जॉर्जियोसला 60 व्या मिनिटाला रिप्लेस केलं. अपोलोन लेडिज फुटबॉल क्लबने एसएफके रिगाचा 3 - 0 असा पराभव केला. ही UWCL चा सलामीचा सामना होता. (Manisha Kalyan has become the first Indian footballer to play at the UEFA Women's Champions League)

Manisha Kalyan has become the first Indian footballer to play at the UEFA Women's Champions League
महिला बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच छतावरून ढकलले

20 वर्षाची मनिषा कल्याण ही विदेशी क्लबकडून करारबद्ध होणारी चौथी भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. मनिषाने राष्ट्रीय संघाकडून आणि इंडियन वुमन्स लीग (IWL) स्पर्धेत गोकुलम केरला संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. तिला नुकताच ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा महिला फुटबॉलर ऑफ द इयर 2021 - 22 पुरस्कार मिळाला आहे. मनिषा वर्ल्डकप उपविजेत्या ब्राझील संघाविरूद्ध गोल केल्यानंतर प्रकाशझोतात आली होती.

Manisha Kalyan has become the first Indian footballer to play at the UEFA Women's Champions League
VIDEO | India Vs Pakistan : शोएबचे दादाच्या बरगड्या होते टार्गेट; पाहा पुढे काय झालं

मनिषा ही गोकुलम केरलाची विदेशी क्लबकडून खेळणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी दांगमेई ग्रेस उझबेकिस्तानच्या नासाफ फुटबॉल क्लबकडून खेळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com