Hind Kesari Kitab : 'हिंद केसरी'ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीतने मारलं मैदान

abhijit katke  win Hind Kesari Kitab beat wrestler somveer in final  hind kesari 2023 winner
abhijit katke win Hind Kesari Kitab beat wrestler somveer in final hind kesari 2023 winner

हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणार्या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या पैलवानने बाजी मारल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला मात दिली. अभिजीतने सोमवीर याला 4-0 अशा फरकाने पराभूत केलं.

अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.

abhijit katke  win Hind Kesari Kitab beat wrestler somveer in final  hind kesari 2023 winner
Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

या विजयानंतर अभिजीतवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ट्विट करत त्याला शुभच्छा दिल्या आहेत. त्यांनी "वा रे... पठ्ठ्या ! आपल्या वाघोलीचे सुपुत्र पैलवान अभिजित कटके हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! "अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

abhijit katke  win Hind Kesari Kitab beat wrestler somveer in final  hind kesari 2023 winner
Khan Sir : 'खान सर' इतके फेमस का आहेत माहितेय? हा Viral Video एकदा पाहाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com