भारत आशिया कपच्या फायनलमध्ये मात्र पाकिस्तानचं काय झालं? |ACC U19 Asia Cup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ACC U19 Asia Cup India
U19 Asia Cup: भारत फायनलमध्ये मात्र पाकिस्तानचं काय झालं?

U19 Asia Cup: भारत फायनलमध्ये मात्र पाकिस्तानचं काय झालं?

दुबई : भारताच्या १९ वर्षाखालील संघाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील आशिया कपची (ACC U19 Asia Cup)फायनल गाठली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा १०३ धावांनी पराभव करत दिमाखात फायनल गाठली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकात ८ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर टीम इंडियाने (India national cricket team) बांगालदेशचा (Bangladesh) संपूर्ण संघ १४० धावात पॅव्हेलियमध्ये धाडत सामना जिंकला.

हेही वाचा: जसप्रीत बुमराहचे परदेशात विकेट्सचे वेगवान 'शतक'

भारताकडून शेख राशीदने (Shaik Rasheed) दमदार ९० धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र शेवटच्या काही षटकात विकी ओत्सवालने १८ चेंडूत २८ धावांची आक्रमक खेळी करत भारताला २४३ धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडून रकीबुल हसनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

भारताचे २४३ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या बांगलादेशला हे आव्हान पेलवले नाही. भारताच्या (India) सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा करत बांगलादेशला १४० धावात रोखले. भारताकडून राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार, राज बवा आणि विकी ओत्सवालने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. त्यांना निशांत सिंधू आणि कौशल तांबेने प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली. बांगलादेशकडून अश्रिफुल इस्लामने सर्वाधिक ४२ धावा केल्या.

हेही वाचा: टीम इंडियाकडून गाबानंतर आता सेंच्युरियन 'सर'

दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २२ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १४७ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानला हे माफक आव्हानही पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १२५ धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानने (Pakistan National Cricket Team) साखळी फेरीत भारताचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला होता. त्यानंतरही भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात यश आले होते.

आता ३१ डिसेंबर म्हणजे उद्या भारत आणि श्रीलंका यांच्यात आशियातील किंग कोण हे ठरवण्यासाठी लढत होणार आहे.

Web Title: Acc U19 Asia Cup India Reach In Final Pakitan Losst In Semi Final Against Sri Lanka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketTeam IndiaAsia Cup