जसप्रीत बुमराहचे परदेशात विकेट्सचे वेगवान 'शतक'

Jasprit Bumrah
Jasprit Bumrahesakal

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका 113 धावांनी पराभव केला. (South Africa national cricket team) भारताकडून पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा करत प्रत्येकी ३ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १९१ धावात संपवला.

Jasprit Bumrah
टीम इंडियाकडून गाबानंतर आता सेंच्युरियन 'सर'

घोटा दुखावलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चौथ्या दिवशी चांगला मारा करत वॅन डेर ड्युसेन आणि केशव महाराज यांची विकेट घेतली. ज्यावेळी जसप्रीत बुमराहने ड्युसेनची विकेट (Wicket) घेतली त्यावेळी त्याने एक खास विक्रम प्रस्थापित केला. त्याने आपले परदेशातील विकेटचे शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी २२ व्या कसोटीत (Test cricket) केली. बुमराहने भारताचे माजी गोलंदाज बीएस चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांचे परदेशात सर्वात कमी कसोटीत १०० विकेट घेण्याचा विक्रमही मोडला. बीएस चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांनी २५ कसोटीत (Test cricket) ही कामगिरी केली होती.

Jasprit Bumrah
'रोनाल्डोचा पुतळा बसवणे हा तर गोव्याचा अपमान'

भारताकडून आतापर्यंत परदेशात १०० विकेट घेण्याची कामगिरी १० गोलंदाजांनी केली होती. आता जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अशी कामगिरी करणारा भारताचा ११ वा गोलंदाज झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com