Adani Group Interested in Buying RCB Franchise
esakal
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ लवकरच विक्रीसाठी काढला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीबीच्या मालकाकडून संघाची किंमत जवळपास २ अब्ज डॉलरपर्यंत ठेवण्यात आली आहे. तसेच हा संघ खरेदी करण्यासाठी अदाणी समुहासह पाच मोठ्या कंपन्या इच्छूक असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आरसीबीचा नवा मालक कोण असेल? याची उत्सूकता सर्वांना लागली आहे.